मराठीविषयी शासनदरबारी अनास्था

मराठीबद्दल शासनदरबारी अनास्था आहे असा आक्षेप ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी नोंदविला.

जनस्थान पुरस्कार सोहळ्यात मधु मंगेश कर्णिक यांची नाराजी

नाशिक : मराठी भाषेचे भवितव्य, अध्ययन, अध्यापन, मुंबईतील घसरता टक्का असे अनेक प्रश्न आहेत. मुंबई आणि आसपासच्या भागांत वेगवेगळ्या राज्यांचे भवन, भाषाभवन आहेत, परंतु महाराष्ट्राच्या राजधानीत महाराष्ट्राचे भवन नाही. मराठीबद्दल शासनदरबारी अनास्था आहे असा आक्षेप ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी नोंदविला.

हे वाचले का?  बेकायदेशीर भूसंपादन, शैक्षणिक आरक्षण बदल, बदल्या; नाशिक मनपाविरोधात छगन भुजबळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांना मराठी साहित्याबद्दल प्रेम, आदर असला तरी प्रशासकीय अधिकारी वर्ग काही करीत नाही  असे त्यांनी सांगितले.

नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक कर्णिक यांना प्रदान करण्यात आला.