महाराष्ट्रात कर्नाटक प्रारूप राबविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न, राज्यस्तरीय मेळाव्यातून निवडणुकीची तयारी

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विविध समाजघटकांना एकत्र करून निवडणूक जिंकण्याचे प्रारूप महाराष्ट्रातही राबविण्याचा पक्षाने प्रयत्न सुरू केला आहे.

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विविध समाजघटकांना एकत्र करून निवडणूक जिंकण्याचे प्रारूप महाराष्ट्रातही राबविण्याचा पक्षाने प्रयत्न सुरू केला आहे. त्याची सुरुवात अल्पसंख्याक पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यापासून करण्यात आली. आगामी निवडणुकीत काँग्रेसला साथ द्यावी, अशी साद पक्षाच्या नेत्यांनी अल्पसंख्याक समाजाला घातली आहे.

हे वाचले का?  “पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतात, ती वास्तू…”; शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरून ठाकरे गटाचं टीकास्र; मुख्यमंत्र्यांनाही केलं लक्ष्य!

कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसला मिळलेल्या  यशामुळे महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षात उत्साह संचारला आहे. काँग्रेसला विजयाकडे घेऊन जाणारे हे प्रारूप महाराष्ट्रातही राबविण्याचे पक्षाने ठरविले आहे. दादर येथील टिळक भवनात बुधवारी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात प्रामुख्याने कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयाची व अल्पसंख्याक समाजाने पक्षाला दिलेली साथ याची चर्चा करण्यात आली.