रेल्वे प्रवाशांचा प्रवास आणखी सुखद होणार! लॉन्च झाले ‘हे’ जबरदस्त अ‍ॅप; नेटफ्लिक्ससह मिळणार…

नवीन अ‍ॅप येत्या दोन आठवड्यांमध्ये अँड्रॉइड प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिले जाणार आहे.

भारतीय रेल्वेने रोज हजारो प्रवासी प्रवास करतात. याला जगातील चौथ्या क्रमांकाचे रेल्वे नेटवर्क म्हटले जाते. भारतातील १७ झोनमध्ये १९ हजारांहून अधिक रेल्वे धावतात. या १९ हजार रेल्वे गाड्या विविध श्रेणींमध्ये विभागल्या आहेत. इमू आणि मेमू रेल्वेचाही यात समावेश होतो. भारतीय रेल्वे आपल्या गरजेनुसार, वेगवेगळ्या श्रेणीतील रेल्वेचा वापर करते. आता रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन App लॉन्च केले आहे. प्रवाशांचा प्रवासाचा अनुभव सुखद करण्यासाठी 3i Infotech , NuRe Bharat Network आणि RailTel ने PIPOnet मोबाईल App तयार केले आहे.

हे वाचले का?  कॅनडाने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला; भारताचे उच्चायुक्त संजय वर्मा यांचा आरोप; वागणुकीवरही टीकास्रा

PIPOnet या मोबाइल App मध्ये ई-तिकीटच्या सुविधेसह प्रवास, आरक्षण आणि मनोरंजनाची सुविधा मिळणार आहे. NuRe Bharat Network चे सीईओ सॅक्स कृष्णा म्हणाले, ”नवीन अ‍ॅप येत्या दोन आठवड्यांमध्ये अँड्रॉइड प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यानंतर रेल्वे प्रवासी हे अ‍ॅप डाउनलोड करू शकणार आहेत. तसेच ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी अ‍ॅपमध्ये तिकीटाव्यतिरिक्त इतर सुविधाही दिल्या जात आहेत. प्रवाशांचा लांबचा प्रवास सुखद करण्यासाठी अ‍ॅपमध्ये नेटफ्लिक्सची सुविधा मिळणार आहे.”

इतकेच नव्हे तर, या अ‍ॅपमध्ये प्रवाशांना ओला आणि उबरसारख्या सुविधाही मिळणार आहेत. अ‍ॅपचा वापर करणारे वापरकर्ते त्याच्या मदतीने ट्रेनचे तिकीट बुक करण्यापासून ते राहणे , खाणे व इतर सुविधांचाही लाभ घेऊ शकणार आहेत. PIPOnet च्या मदतीने जाहिरातदारांना भारतातील टियर १,२,३ आणि ४ शहरांपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे. PIPOnet मध्ये जी कमाई होईल त्यातील ४० टक्के वाटा हा Nure Bharat Network ला मिळणार आहे.

हे वाचले का?  ‘डिजिटल अरेस्ट’चा मुद्दा पंतप्रधानांकडून अधोरेखित

अ‍ॅपबद्दल माहिती देताना सीईओ सॅक्स कृष्णा म्हणाले, ” या अ‍ॅपच्या मदतीने अशा जाहिरातदारांना देखील मदत होणार आहे ज्यांना आपली जाहिरात रेल्वे प्रवाशांपर्यंत पोचवायची आहे. या अ‍ॅपमध्ये सर्व प्रकारची फीचर्स उपलब्ध करण्यासह पुढील पाच वर्षांत १,००० कोटी रुपयांची कमाई करण्याचे NuRe Bharat Network चे उद्दिष्ट आहे.

हे वाचले का?  भारत-चीन सीमावाद : देप्सांग आणि देम्चोक भागातून सैन्य मागे प्रक्रिया पूर्ण; भारतीय सैनिकांना पूर्वीप्रमाणे गस्त घालता येणार