“वीर सावरकर यांना भारतरत्न देण्यासंदर्भात आम्ही…”, रणजीत सावरकर यांचं महत्त्वाचं भाष्य

वीर सावरकर यांच्या भारतरत्नाविषयी रणजीत सावरकर यांचं महत्त्वाचं विधान

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी कायमच केली जाते. काही दिवसांपूर्वीच लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. त्याचप्रमाणे कर्पूरी ठाकूर, पी. व्ही. नरसिंहराव, चौधरी चरणसिंह आणि कृषी क्षेत्रात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या एम. एस. स्वामिनाथन यांनाही भारतरत्न जाहीर झाला आहे. या वर्षी एकूण पाच जणांना भारतरत्न जाहीर झाला आहे. यानंतरही वीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत तसंच उद्धव ठाकरे यांनीही ही मागणी केली. मात्र वीर सावरकर यांच्या भारतरत्न पुरस्कारावर रणजीत सावरकर यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे.

हे वाचले का?  निवडणूक प्रक्रियेत तरुणांचा सहभाग आवश्यक!

वीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी बुधवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली. रणजीत सावरकर म्हणाले की सध्याचं सरकार हे वीर सावरकरांच्या विचारावर चालणारं सरकार आहे. वीर सावरकर यांचे विचार घेऊन पुढे जातील त्यांच्या मागे आम्ही उभे राहू. तसंच भारतरत्न पुरस्कारावर त्यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे.

रणजीत सावरकर यांनी काय म्हटलं आहे?

सावरकर कुटुंबीयांची ही मागणी कधीच नव्हती की वीर सावरकरांना भारतरत्न मिळावं. स्वातंत्र्यवीर आणि हिंदूहृदय सम्राट या दोन पदव्या ज्या भारतीयांनी त्यांना दिल्या आहेत त्याच आम्ही महत्त्वाच्या मानतो. त्यामुळे या संबंधी आम्ही चर्चा केली नाही आणि करणारही नाही. असं रणजीत यांनी म्हटलं आहे.