‘शिवशक्ती’ नावावर आंतरराष्ट्रीय संघटनेचे शिक्कामोर्तब

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने २३ ऑगस्ट २०२३ ला चंद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरले.

पीटीआय, नवी दिल्ली

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने २३ ऑगस्ट २०२३ ला चंद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरले. इस्रोच्या या मोहिमेचे केवळ भारतातूनच नाही, तर जगभरातून कौतुक झाले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत जगातील पहिला देश ठरला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे कौतुक करताना चंद्रयान-३ ज्या ठिकाणी उतरले, त्या लँडिंग साईटला ‘शिवशक्ती’ हे नाव दिले होते. आता आंतरराष्ट्रीय संघटनेने या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

हे वाचले का?  महुआ मोइत्रांच्या अडचणीत वाढ; कॅश फॉर क्वेरी प्रकरणात CBI गुन्हा दाखल करणार, लोकपालांकडून तपासाचे आदेश

चंद्रयान-३ मोहिमेच्या ऐतिहासिक यशाच्या सात महिन्यांनी आता आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघाने पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या ‘शिवशक्ती’ या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघाने मंजूर केलेल्या ग्रहांच्या नावांबद्दल तपशीलवार माहिती दिली आहे. यामध्ये प्लॅनेटरी नामांकनानुसार चंद्रयान-३ चे विक्रम लँडर जिथे उतरले, त्या लँडिंग साईटच्या ‘शिवशक्ती’ नावाला मान्यता दिलेली आहे. यानंतर आता अधिकृतरित्या जगभरात चंद्रयान-३ जिथे उतरले, त्या ठिकाणाला ‘शिवशक्ती’ नावाने ओळखले जाणार आहे. त्यामुळे ही भारतासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे, असे सांगितले जात आहे.

हे वाचले का?  विकसित भारत संदेश पाठविणे थांबवा! निवडणूक आयोगाचे सरकारला आदेश; आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी

दरम्यान, शिवशक्ती आणि तिंरगा पॉईंट दोन्ही नाव भारतीयच आहेत. ते देशाचे पंतप्रधान आहेत, त्यामुळे नाव देण्याचा त्यांना अधिकार आहे. ‘शिवशक्ती’ नाव देण्यावरून काहीही वाद नाही. चंद्रयान-३ जिथे उतरले, त्या जागेला शिवशक्ती नाव का दिले? त्याचा अर्थही पंतप्रधानांनी समजावून सांगितला, अशी प्रतिक्रिया इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांनी त्यावेळी दिली होती.