२१ व्या वर्षी ४५ लाखांच्या पॅकेजची नोकरी, राजस्थानची तान्या सिंह जपानच्या जगप्रसिद्ध आयटी कंपनीत कशी पोहोचली?

राजस्थानच्या पिलानी येथील चिदावा रोड येथे राहणाऱ्या तान्या सिंग धाभाई हिने वयाच्या २१ व्या वरषी ४५ लाख रुपायंच्या वार्षिक पॅकेजची नोकरी मिळवली आहे.

पदवी हातात आल्यानंतर लागलीच चांगल्या पगाराची नोकरी मिळावी असं सगळ्यांचंच स्वप्न असतं. पण प्रत्येकाचं हे स्वप्न साकार होत नाही. इंटर्नशीप, अॅप्रेन्टिशिपच्या नावाखाली वर्ष-दोन वर्ष गेल्यानंतर मूळ पगार सुरू होतो. परंतु, तो पगारही अनेकदा तुटपूंजा वाटतो. त्यामुळे शिक्षण झाल्यानंतरही लागलीच चांगल्या पगाराची नोकरी मिळेल हे स्वप्न स्वप्नच राहतं. वयाच्या २०-२१ या उमेदीच्या काळात कमी पगारात नोकरी करावी लागत असल्याने अनेक होतकरू नैराश्येत जातात. परंतु, राजस्थानात एका २१ वर्षीय तरुणीला तब्बल ४५ लाख वार्षिक पॅकेजची नोकरी मिळाली आहे. वयाच्या २१ व्या वर्षी एवढं पॅकेज मिळवून तिने इतिहास रचला आहे.

हे वाचले का?  सीबीआय केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली नाही ; केंद्र सरकारचा सर्वोच्च न्यायालयात दावा

राजस्थानच्या पिलानी येथील चिदावा रोड येथे राहणाऱ्या तान्या सिंह धाभाई हिने वयाच्या २१ व्या वर्षी ४५ लाख रुपायंच्या वार्षिक पॅकेजची नोकरी मिळवली आहे. तान्या सिंह धाभाई जपानच्या जगप्रसिद्ध आयटी कंपनीत ‘टेक एम’मध्ये डेटा अॅनॅलिस्ट म्हणून ती काम करणार आहे.

तान्या सिंहचे वडील हजारी सिंह धाभाई गेल्या तीन वर्षांपासून जपानच्या प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी राकुटेनमध्ये उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. ते जवळपास दहा वर्षांपासून जपानमध्ये राहत असून त्यांनी अनेक जापानी कंपन्यांमध्ये काम केलं आहे.

हे वाचले का?  ८८ मतदारसंघांत ६४.३५ टक्के मतदान; देशभरात दुसऱ्या टप्प्यासाठीही कमी प्रतिसाद

लाईव्ह हिंदूस्तानच्या वृत्तानुसार, हजारी सिंह म्हणाले की, “तान्या सिंह लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. तिने पहिल्याच प्रयत्नात BITS पिलानीमध्ये प्रवेश मिळवला होता. एवढंच नव्हे तर येथे ती टॉपसुद्धा झाली. तिने नुकतंच BITS मधून शिक्षण पूर्ण केलं असून आठवडाभरात तिला जपानच्या जगप्रसिद्ध आयटी कंपनीकडून ऑफर मिळाली. तान्या सिंह आता जपानमधील टोकयो येथे कार्यरत आहे. तान्याची आई नीतू सिंह आणि धाकटी बहिण तियाशा सिंह याही जपानमध्ये राहतात.

तान्या सिंहचे वडील हजारी सिंग यांनी सांगितले की, “हार्वर्ड वर्ल्ड स्टुंडट लीडर्स प्रोग्राम आहे, यासाठी तान्याची देखील निवड झाली आहे. या कार्यक्रमात जगभरातून २०० विद्यार्थी निवडले जातात, ज्यामध्ये नामवंत उद्योगपती, अर्थतज्ज्ञ इत्यादी या निवडक विद्यार्थ्यांसोबत त्यांचे अनुभव शेअर करतात.”