Lok Sabha Election 2024 Live : “…तर ईश्वर त्यांचा सत्यानाश करतो”, फडणवीसांच्या वक्तव्यावर रोहित पवार म्हणाले, “सत्तेचा गैरवापर…”

2024 Lok Sabha Election Live Updates, 29 April 2024 : राज्यातील राजकीय, निवडणूक, हवामान, अपघात, गुन्हेसंदर्भातील सर्व महत्त्वाच्या बातम्या वाचा.

Maharashtra Political News Live Today : महााष्ट्रासह देशभरात दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलं असलं तरी महायुतीच्या जागावाटपाचे घोंगडे अद्यापही भिजतच आहे. त्यामुळे महायुतीत कोणाच्या वाट्याला किती जागा मिळणार आणि कोणत्या जागेवरून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. यंदाची लढत थेट महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी असणार आहे, त्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक अटीतटीची ठरणार आहे. दरम्यान, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता मोठा दावा केला आहे. लखनऊमध्ये कोणाचीतरी २०० एकर जमीन आयकर विभागाने जप्त केली आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. यावरून आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यासह राज्यभरातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिवर वाचा.