Ranji Trophy 2024 Final : मुशीर खानचे ३ महिन्यांत चौथे शतक, सचिन तेंडुलकरचा मोडला ‘हा’ खास विक्रम

Musheer Khan Century : मुशीर खान आता रणजी ट्रॉफी फायनलमध्ये शतक झळकावणारा मुंबईचा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा २९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे.

Musheer Khan break Sachin Tendulkar’s record 29 years ago : रणजी ट्रॉफी फायनलमध्ये मुंबईचा फलंदाज मुशीर खानने मंगळवारी, १२ मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर विदर्भाविरुद्ध २५५ चेंडूत शतक झळकावले. तो सचिन तेंडुलकरला मागे टाकत रणजी ट्रॉफी फायनलमध्ये शतक झळकावणारा तो मुंबईचा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. सचिनने २९ वर्षांपूर्वी ही कामगिरी केली होती. आता मुशीरने सचिनचा विक्रम त्याच्यासमोर मोडला आहे. सर्फराझ खानच्या भावाने गेल्या तीन महिन्यात हे चौथे शतक झळकावले आहे.

पहिल्या डावात ११९ धावांची आघाडी घेतल्यानंतर मुंबईने दुसऱ्या दिवशी पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरले. आघाडीची फळी ढासळल्यानंतर मुशीर आणि कर्णधार अजिंक्य रहाणेने डावाची धुरा सांभाळली. मुंबईने पृथ्वी शॉ आणि भूपेन लालवानी यांच्या विकेट्स लवकर गमावल्या. यानंतर रहाणे आणि मुशीर या जोडीने दिवसाचा खेळ संपेपर्यंत कोणताही धक्का बसू दिला नाही. दिवसाचा खेळ संपेपर्यंत मुंबईने २ बाद १४१ धावा केल्या होत्या. दोघांनी आपापली अर्धशतके झळकावली होते.

हे वाचले का?  Ranji Trophy 2024: शार्दूल ठाकूरच्या अष्टपैलू कामगिरीमुळे मुंबई अंतिम फेरीत; तामिळनाडूवर डावानं विजय

मुशीरची चमकदार कामगिरी –

तिसऱ्या दिवशी खेळ सुरू झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मुशीरने रहाणे ७३ धावांवर बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरसह डावाचे नेतृत्व केले. मुंबईच्या डावाच्या ९०व्या षटकात मुशीरने तीन सामन्यांतील दुसरे प्रथम श्रेणी शतक पूर्ण केले. भारतीय फलंदाज सर्फराझ खानचा धाकटा भाऊ मुशीर याने बडोद्याविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात आपल्या पहिल्या प्रथम श्रेणीतील शतकाचे दुहेरी शतकात रूपांतर केले होते. वसीम जाफरनंतर ही कामगिरी करणारा तो मुंबईचा दुसरा सर्वात तरुण फलंदाज ठरला होता.

हे वाचले का?  Gaganyaan Mission : राकेश शर्मानंतर कोणते भारतीय अंतराळवीर अवकाशात जाणार ? पंतप्रधान मोदींनी जाहिर केली चार नावे….

मुशीर खानने आपल्या झंझावाती खेळीसह श्रेयस अय्यरबरोबर १६८ धावांची भागीदारी केली. त्याने ३२६ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने १३६ धावांचे योगदान दिले. मात्र, श्रेयस अय्यरचे अवघ्या पाच धावांनी शतक हुकले. त्याने १११ चेंडूत १० चौकार ३ षटकारांच्या मदतीने ९५ धावा केल्या. सध्या मुंबई संघाची धावसंख्या ११० षटकानंतर ६ बाद ३५७ धावा असून त्यांच्याकडे ४७६ धावांची आघाडी आहे.

सचिनचा विक्रम त्याच्यासमोरच मोडला –

१९ वर्षे आणि १४ दिवस वयाच्या मुशीरने रणजी फायनलमध्ये शतक झळकावणारा मुंबईचा सर्वात तरुण फलंदाज म्हणून सचिनचा विक्रम मोडला. त्याच्या २२ व्या वाढदिवसाच्या एक महिना आधी, तेंडुलकरने १९९४-९५ हंगामाच्या अंतिम सामन्यात पंजाबविरुद्ध दुहेरी शतक झळकावले. त्याने आपल्या संघाला विजेतेपद दिले होते. योगायोगाने वानखेडेवर विदर्भ आणि मुंबई यांच्यातील अंतिम सामन्यात सचिन स्टँडवर उपस्थित होता.