नाशिक: अनधिकृत शाळेप्रकरणी संस्थाचालकांवर गुन्हा

याबाबत मनपा शाळेतील गोपाल बैरागी यांनी तक्रार दिली.

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: जेलरोड परिसरातील एमराल्ड हाईट्स पब्लिक स्कूलला कायमस्वरुपी बंद करण्याची नोटीस बजावूनही ही शाळा अनधिकृतपणे चालवून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी तिरुपती एज्युकेशन ॲण्ड चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षांसह अन्य पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

हे वाचले का?  द्राक्ष उत्पादकांची फसवणूक करणाऱ्या महिलेस दिल्लीत अटक

याबाबत मनपा शाळेतील गोपाल बैरागी यांनी तक्रार दिली. नाशिकरोडच्या जेलरोड परिसरात तिरुपती एज्युकेशन ॲण्ड चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेची एमराल्ड हाईट्स पब्लिक स्कूल ही शाळा आहे. या शाळेला कायमस्वरुपी बंद करण्याची नोटीस शिक्षण विभागाने बजावली होती.

तथापि, संस्था चालकांनी शाळा बंद न करता ती अनधिकृतपणे सुरू ठेवली. यात शासनाची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार यांच्या विरोधात बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षण अधिनियमान्वये नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.