वयाची १८ वर्षे पूर्ण होताच मतदार यादीत नाव येणार, केंद्र सरकार आणणार ‘ही’ नवी पद्धत; जनगणनेबाबतही शाहांचा मोठा दावा

१८ वर्षे पूर्ण झालेल्या मतदारांची नावे मतदार यादीत येण्याकरता प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मात्र, ही प्रक्रिया सुलभ व्हावी याकरता केंद्र सराकर एक नवी पद्धत आणणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी सांगितलं.

आगामी निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. जागावाटपाच्या बैठकांना जोर आला असून मतदारांनाही आश्वासनांची प्रलोभने दाखवायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, निवडणुकीकरता सर्वांत महत्त्वाचं असणाऱ्या मतदार याद्यांच्या अद्यायवतीकरणालाही वेग आला आहे. १८ वर्षे पूर्ण झालेल्या मतदारांची नावे मतदार यादीत येण्याकरता प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मात्र, ही प्रक्रिया सुलभ व्हावी याकरता केंद्र सरकार एक नवी पद्धत आणणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी सांगितलं.

“एखाद्याच्या वयाची १८ वर्षे पूर्ण होताच त्याचं नाव मतदार यादीत येण्याकरता नव्या उपाययोजना आखण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे. निवडणूक आयोग संबंधित व्यक्तीची परवानगी घेऊन त्याचं मतदान कार्ड तयार करणार आहे. तर एखाद्याचं निधन झाल्यास संबंधितांचं नाव मतदार यादीत काढून टाकणार आहे”, असं शाह म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जनगणना भवनाचे उद्धाटन केले. त्यावेळी ते बोलत होते. “विकासाची मूलभूत योजना तयार करण्यास जनगणनेतून प्राप्त झालेला डेटा महत्त्वाची ठरतो. तसंच, यामुळे वंचित आणि शोषितांना मूलभूत सुविधा प्रदान करणेही सरकारला सोपे जाते”, असं अमित शाह म्हणाले.

हे वाचले का?   ‘नीट-यूजी’ परीक्षेत व्यवस्थेला खिंडार नाही ; सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

जनगणना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होणार

देशाच्या एकूण प्रगतीकरता डेटा आधारित नियोजन करणे गजरेचे आहे. हा डेटा जणगणनेतूनच प्राप्त होऊ शकतो, असंही शाह म्हणाले. मोदी सरकार आता जनगणना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करणार आहे. ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला डेटा भरण्याचा अधिकार असेल. व्यक्तीने भरलेल्या माहितीची पडताळणी आणि ऑडिट केले जाईल. त्यात सामाजिक-आर्थिक स्थितीचे 35 पेक्षा जास्त पॅरामीटर्स समाविष्ट असतील, असंही शाहांनी पुढे स्पष्ट केलं. जन्म आणि मृत्यूची नोंद ऑनलाईन करण्याकरता संसदेच्या आगामी अधिवेशनात विधेयक आणण्यात येणार आहे.

हे वाचले का?  महामतदान २० नोव्हेंबरला! राज्यात विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २३ नोव्हेंबर रोजी निकाल

मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी आताची पद्धत कशी?

मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी निवडणूक नोंदणी विभागाकडे ‘फॉर्म ६’ द्वारे अर्ज करावा लागतो. यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रेदेखील फॉर्मबरोबर जमा करावी लागतात. फॉर्म आणि ही कागदपत्रे निवडणूक नोंदणी विभाग किंवा निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांकडे जमा करावी लागतात. यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत, ते म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन. जर या प्रक्रियेबाबत काही शंका असेल तर तुम्ही 1950 या क्रमांकावर फोन करु शकता. (या नंबरपूर्वी तुमचा एसटीडी कोड वापरण्यास विसरू नका.)

हे वाचले का?  नाशिक फाटा-खेड महामार्गासाठी ८ हजार कोटी; केंद्राकडून महत्त्वाकांक्षी ८ प्रकल्पांना मंजुरी