Maharashtra News Live : “ठाकरे गटातील ८ आमदार माझ्या संपर्कात”, उदय सामंत यांचा दावा

Maharashtra Political News Live Today, 03 April 2024 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Mumbai News Live Today : राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. परंतु, महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. घटक पक्षातील मतभेदांमुळे जागा वाटप निश्चित होत नाही. गेल्या काही वर्षांत आयाराम-गयाराम यांची संख्या वाढल्याने कोणाला उमेदवारी द्यायची, असा तिढा निर्माण झाला आहे. येत्या एक-दोन दिवसांत आघाडी आणि युतीचे उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा.